News34 chandrapur
ब्रह्मपुरी – केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन भाजपाला सोडचिठ्ठी देत ब्रम्हपूरी तालुक्यातील चौगान येथील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विकासकामांवर व खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या नेतृत्वाखाली चौगान येथील भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी पक्षप्रवेश कार्यक्रमाला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, चौगान ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष पंकज तिडके यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सर्व नवप्रवेशित नागरिकांच्या गळ्यात काॅंग्रेस पक्षाचा दुप्पटा घालून पक्षात स्वागत करतांना ते म्हणाले की, पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे काॅंग्रेस पक्षात स्वागत असुन प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द असुन आपल्या समस्या, अडचणी माझ्या पर्यंत घेऊन यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये गणेश प्रधान, भोजराज प्रधान, नंदु नवघडे, मन्साराम बुराडे, प्रभाकर मैंद, नरेश ठाकरे, भाऊराव भाकरे, उमेश बुराडे, प्रदीप सोंदरकर, कैलास बुराडे, गोपाल बुराडे, गायत्री बुराडे, नंदिनी ठाकरे, हेमलता सोंदरकर, माणिक अर्जुनकार, मनोहर मेश्राम, हिवराज भोगेवार, विजय सहारे, पुरुषोत्तम पिलारे, सविता भोगेवार, संजय मैंद, अविनाश चौधरी, ज्योत्स्ना बुरांडे, अनिता वाटकर यांसह अन्य नागरिकांचा समावेश आहे.