News34 chandrapur
चिमूर:- गुणवंत चटपकार
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशभरात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिरात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता केली.
आज दिनांक २१ जानेवारी रविवार सकाळी ७ वा.श्रीहरी बालाजी मंदिराच्या आवारात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या हाती झाडू व सफाईचा पोचा घेऊन साफसफाई करून मंदिर स्वच्छ केले. त्यात आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी ‘अब की बार, फिर मोदी सरकार २०२४’ असे सांगत पुन्हा भाजप सरकारच्या विजयाचा संकल्प केला.
दरम्यान आमदार बंटी भाऊ भांगडिया यांनी नप च्या सफाई कर्मचारी सोबत सवांद साधला.
जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या.
सदर स्वच्छता अभियानाला भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, देवस्थान ट्रस्टी नैनेश पटेल माजी सभापती प्रकाश वाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास धनोरे, युवा नेते समीर राचलवार ओबीसी नेते एकनाथ थुटे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष बंटी वनकर, कुणाल कावरे, माजी सभापती सतीश जाधव जयंत गौरकर, नितेश दोडके, प्रकाश बोकारे,आशु झिरे, गोलू भरडकर, गोलू मालोदे विलास कोराम श्रेयस लाखे अमित जुमडे, सचिन डाहूले नरेंद्र हजारे विकी कोरेकर,भुषन सातपुते तसेच रोटरी क्लब चे पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.