Thursday, May 23, 2024
Homeक्रीडापालकमंत्री मुनगंटीवार यांचा नवा विश्वविक्रम

पालकमंत्री मुनगंटीवार यांचा नवा विश्वविक्रम

सियावर रामचंद्र की जय हा 11 अक्षरी मंत्र 30 हजार दिव्यांनी झाला प्रकाशमय

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव साता समुद्रापार पोहचविण्याचा विश्वविक्रम केला आहे, 20 जानेवारीला चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्राला 30 हजार दिव्यांनी प्रकाशमय करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चंद्रपूरचे नाव नोंदविले.

येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याआधी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र संपूर्ण जगाला कळावे यासाठी हे अक्षरी मंत्र तब्बल 30 हजार दिव्यांनी सजविण्यात आले.

 

चांदा क्लब मैदानावर 100 चौरस फूट जागेवर सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र साकारण्यात आले, त्यावर 30 हजार दिव्याच्या पणत्या लावत चांदा क्लब मैदान परिसर प्रकाशमय करण्यात आले.

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाने आयोजित केला होता.

 

आज 21 जानेवारीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे पालकमंत्री मुनगंटीवार यांना नव्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

20 ते 22 जानेवारी पर्यंत चांदा क्लब मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!