उच्चशिक्षित तरुण निघाला घरफोडीचा आरोपी, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरात होणाऱ्या घरफोड्या पोलिसांना आव्हान देणाऱ्या होत्या, त्या घरफोडी गुन्ह्याना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांची गंभीर दखल घेतली. त्यानंतर 2 गुन्ह्याचा उलगडा करण्यास यश मिळविले.

 

पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार केले, याबाबत सापळा सुद्धा रचला अखेर 12 जानेवारीला गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील व घरफोडी प्रकरणातील गुन्हेगार हे संशयास्पद रित्या फिरत आहे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 वर्षीय आशिष रेड्डीमल्ला राहणार रयतवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक याला ताब्यात घेत विचारपूस केली.

 

 

श्रीनगर कॉलोनी, लालपेठ व बाबूपेठ परिसरात त्याने 2 घरफोडी केली असल्याची बाब कबूल केली, त्या दोन्ही घरफोडी मध्ये आशिष ने सोन्याचे दागिने असा एकूण 77 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता, आशिष जवळून तो मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

विशेष बाब म्हणजे आरोपी आशिष हा उच्चशिक्षित आहे, आरोपीवर याआधी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, तसेच सायबर पथक यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!