Thursday, June 20, 2024
Homeग्रामीण वार्तामूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू - आमदार प्रतिभा धानोरकर

मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू – आमदार प्रतिभा धानोरकर

नवनियुक्त महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांचा सत्कार समारंभ

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा निराकरण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

दि. 12 जानेवारी रोजी, नांदगाव (घोसरी)येथे विनोद अहिरकर यांचा महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “मूल-पोंभुर्णा तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न असतील, ते मी सर्वप्रथम शासनाच्या निदर्शनास आणून देईन. त्यानंतर, त्या प्रश्नांचा निराकरण करण्यासाठी मी माझी सर्वतोपरी मदत करेन. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करत असताना, त्यांना कुठेही गरज लागली, तर त्यांची एक मोठी बहीण म्हणून मी कायम त्यांच्यासोबत आहे.”

 

 

या सत्कार समारंभाला महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद भाऊ दत्तात्रय, बल्लारपूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा सभापती बाजार समिती पोंभुर्णा रविभाऊ मरपल्लीवर, वैशालीताई पुल्लावार, तसेच मुल व पोंभुर्णा तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

 

 

यावेळी आमदार धानोरकर यांनी, “राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दलही आपण सर्वांनी चिंता व्यक्त केली पाहिजे. दोन वर्षांच्या कोविड काळात अनेक लोकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. भाजपाची सत्ता आली तेव्हापासून देश मागे जात आहे.”

 

“संपूर्ण लोकसभा मतदारसंघ हा पोरका झालेला नाही. साहेब जरी गेले असले तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द, त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टी या सात महिन्याचा कार्यकाळात मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात सुद्धा कामाच्या संदर्भात कुठला विषय असेल तर आपण नक्की माझ्यापर्यंत या. चंद्रपूरला सुद्धा आमचे जनसंपर्क कार्यालय आहे. तिथपर्यंत माझ्या माध्यमातून जेवढ्या कामाचा पाठपुरावा करता येईल, तेवढे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,” असेही आमदार धानोरकर यांनी आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!