Thursday, April 25, 2024
Homeगुन्हेगारीचंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या

चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या

जमावाने आरोपीच्या वाहनाची केली तोडफोड

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर ची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या हत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे.

 

घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती, गर्दी ने आरोपीच्या वाहनाची तोडफोड केली, विशेष बाब म्हणजे दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वी हाफ मर्डर च्या केस मधून जामिनावर बाहेर आले होते.

 

मृतक व आरोपी यामध्ये काही वाद झाला होता, त्याबाबत बोलण्याकरिता मृतक आरोपीला भेटायला गेला होता, मात्र त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला, सदर वादात युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला, त्या हल्ल्यात शिवा वझरकर जागीच ठार झाला.
शिवा हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

 

 

या प्रकरणी फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, बल्लारपूर, घुग्घुस, भद्रावती व चंद्रपूर पोलीस दाखल झाले होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!