चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

News34 chandrapur

चंद्रपूर: 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडू धोतरे यांना प्रसार भारती तर्फे निमंत्रण देण्यात आले आहे.

 

 

देशातील मन की बात कार्यक्रमात गौरवप्राप्त शेकडो व्यक्ती – संस्था प्रतिनिधीना यंदा दिल्ली येथे प्रसार भारतीकडून निमंत्रण देत बोलविण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचा उल्लेख 27 ऑक्टोबर 2017 रोजीच्या आकाशवाणी वरील मन की बात कार्यक्रम मध्ये इको-प्रो संस्थेच्या वतीने गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास सुरू असलेल्या ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ चा उल्लेख करीत संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला स्वच्छता कार्याचा गौरव करण्यात आलेला होता. पंतप्रधान यांनी उल्लेख केला तेव्हा जवळपास या अभियानास अविरत श्रमदानाचे 200 दिवस पूर्ण झालेले होते, मनकीबात कार्यक्रम नंतरही एकूण 1020 दिवस कोविड लोकडाऊन पर्यंत हे अभियान सुरू होते.

 

बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सुरू झालेला ‘हेरिटेज वॉक’

सदर अभियान स्वच्छता पुरते मर्यादित न राहता पुढे याच किल्ला परकोटवरून संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत ‘हेरिटेज वॉक’ हा स्थानिक पर्यटनास चालना देणारा उपक्रम सुरू केला. अनेक चंद्रपूरकर नागरिक, विद्यार्थी ताडोबा येणारे पर्यटक सहभागी होऊ लागले. यासोबतच “आपला वारसा, आपणच जपुया” ही मोहीम घेऊन बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात 25 संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोटरसायकल ने नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा स्थळी भेट देत “महाराष्ट्र परिक्रमा” पूर्ण केली होती.

 

बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

यापूर्वी बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित झाले असून इको-प्रो संस्थेस सुद्धा हा गौरव प्राप्त झालेला आहे. भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय द्वारा देश व युवा कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवकांना “राष्ट्रीय युवा पुरस्कार” दिला जातो. पर्यावरण, वन-वन्यजीव, आपात्कालीन व्यवस्थापन, आरोग्य, रक्तदान, पुरातत्व, शालेय विद्यार्थी तसेच युवा कार्यात महत्वपूर्ण योगदान आहे.

 

गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्याचे आमंत्रण मिळाले हे माझे भाग्य आहे. हे आमच्या इको-प्रो संस्थेच्या कार्याचे आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक आहे. हे अभियान सुरू करण्यासाठी आम्ही अनेक आव्हानांना तोंड दिले. पण, आमच्या एका जिद्दीने आम्ही हे अभियान यशस्वी केले.

 

या अभियानाच्या माध्यमातून आम्ही चंद्रपूरच्या गोंडकालीन ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला, आता कुठे हा प्रवास सुरु झाला असून अजून बरेच काही करणे बाकी आहे. आशा आहे की, आमच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तेही आपल्या समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी पुढे येतील.
– बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!