कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

News34 chandrapur

चंद्रपूर – महाराष्ट्रातील सर्व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जा विभागातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने महाऔष्णीक विद्युत केंद्र कोरोडी येथे उर्जा विभागातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आपल्या मागण्या घेऊन 17 जानेवारी पासून आमरण उपोषणाकरीता बसले आहे. त्यासंदर्भात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

महाराष्ट्रातील सर्व  महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रषिक्षणार्थ्यांच्या वतीने 17 जानेवारी पासून विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यातील काही प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती खराब झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आठ दिवस होऊन देखील शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्र व्यवहार करुन सदर आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

 

या आधी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या घेऊन विधानसभेत आवाज उठवला तसेच शासन दरबारी बैठकांचे आयोजन देखील केले. परंतू सरकार यावर गंभीर नसल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

 

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्त ऊर्जा विभागातील कुशल प्रशिक्षणार्थ्यांचा देखील या आंदोलनाला पाठींबा असून यासर्व मागण्या संदर्भात तातडीने पावले उचलावी अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आमदार प्रतिभाताई धानेारकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!