Tuesday, February 27, 2024
Homeचंद्रपूर ग्रामीणखेळाडूंसाठी आनंदाची वार्ता - ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास...

खेळाडूंसाठी आनंदाची वार्ता – ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली क्रीडा संकुलासाठी 25 कोटींचा विकास निधी मंजूर

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

ब्रह्मपुरी – ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर शासनाच्या वतीने क्रीडा संकुले उभारण्यात आली. अशातच ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलन मध्ये प्रलंबित असलेल्या विकास कामांना अखेर पूर्णविराम मिळाला असून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नातून मतदारसंघातील तीनही तालुक्याला एकूण 25 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून लवकरच ही विकासकामे सुरू करण्यात येणार आहे.

 

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात सिंदेवाही सावली व ब्रह्मपुरी अश्या तीन तालुक्यांचा समावेश आहे. मात्र क्रीडा साहित्य व इतर सोयी सुविधा अभावी आणि खेळाडूंना आपल्या खिलाडी वृत्तीचे प्रदर्शन करणे अवघड जाते. अश्या अनेक प्रतिभावंत खेळाडू व त्यांची प्रतिभा सर्वांपुढे यावी तसेच त्यांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करावे या उदांत हेतूने राज्याची विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील तीनही तालुक्यातील क्रीडा संकुलनामध्ये प्रलंबित असलेली विकास कामे याची मागणी रेटून धरत खेळाडूंकरिता पूर्णपणे शक्ती पणाला लावून शासनाकडून 25 कोटीचा निधी मंजूर करून आणला.

 

यात सिंदेवाही येथील क्रीडा संकुला पाच कोटींचा विकास निधी प्राप्त झाला असून सिंथेटिक हॉकी टर्फ प्रेक्षक गॅलरी, बास्केटबॉल कोर्ट दुरुस्ती व चेनलिंग फेंसिंग क्रीडांगण समपातळीकरण 200 मीटर धावपथ दुरुस्ती, धावनपथाच्या एका बाजूला प्रेक्षक गॅलरी विथ रुपी पाणी व्यवस्था क्रीडा साहित्य आदी कामांचा समावेश आहे.तर ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुल मध्ये एकूण सात कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक इंनडोर हॉलची दुरुस्ती, वुडन फ्लोरिंग बास्केटबॉल कोर्ट सिंथेटिकरण चेंज प्रेक्षक गॅलरी विथ रुपींग खेळांची मैदानी क्रीडा साहित्य विद्युतीकरण व अन्य विकास कामांचा समावेश आहे. तर सावली येथील क्रीडा संकुल मध्ये होऊ घातलेल्या विकास कामांकरिता एकूण 12 कोटींचा विकास निधी मंजूर झाला असून यात बॅडमिंटन हॉल, ऑफिस, जिम हॉल, 400 मीटर धावनपत फुटबॉल मैदान संरक्षण भिंत कबड्डी ,खो-खो ,व्हॉलीबॉल मैदाने, क्रीडा साहित्य फर्निचर, पाणी सुविधा, अशा विविध विकास कामांचा समावेश आहे.

 

ब्रह्मपुरी मतदार संघातील या तीनही तालुक्यांमध्ये विकास कामांकरिता एकूण 25 कोटी असा मोठा विकास निधी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मिळाला असून ग्रामीण खेळाडूंना मैदानी स्पर्धा व स्पर्धा पूर्वतयारी याकरिता अधिकाधिक भाव मिळणार आहे. तसेच लवकरच तीनही क्रीडा संकुलनामध्ये विकास कामांना सुरुवात होणार असून खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular