News34 chandrapur
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देवून उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. विद्यार्थी हाच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहराध्यक्ष ॲड. मेघा भाले यांनी विसापूरात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुक वाटप दरम्यान केले आहे.
काँग्रेस नेत्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात विसापूर येथील जिल्हा परिषद प्राध्यमिक शाळेतील विद्यार्थांना नोटबुक वाटप करण्यात आले.
यावेळी बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहराध्यक्ष ॲड. मेघा भाले मॅडम, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या शहर उपाध्यक्ष ममता चंदेल, सामाजिक कार्यकर्त्या संगीता विलास बावणे, सुष्मा तिरुपती गिरडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका कलावती वानखेडे, इतर शिक्षिका लीलावती नंदुरकर, नीता वासाडे, मीनाक्षी कुंभारे, विना वैरागडे, स्वाती मेश्राम तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, विद्यार्थी हाच देशाचा उज्ज्वल भविष्य आहे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देवून उत्तम नागरीक घडविणे हे शिक्षकाचे कर्तव्यच आहे. तसेच आपल्या शाळेतील खेळांडूनी जगात नांव लौकीक करावे असे आवाहन ॲड. मेघा भाले यांनी केले आहे. काँग्रेस नेत्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना नोटबुकलस चॉकलेट वाटप करण्यात आले.