चंद्रपूर शहरात 4 अस्वलीने दिले दर्शन

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात मागील काही दिवसांपासून अस्वलीचे नागरिकांना दर्शन होत आहे, लालपेठ कॉलरी क्रमांक 2 येथील समृद्धी नगर भागात 9 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 4 अस्वल त्याठिकाणी दाखल झाले.

समृद्धीनगर भागात बोरीचे झाड मोठ्या प्रमाणात असल्याने अस्वल त्याठिकाणी 8 दिवसापासून येत आहे, नागरिकांनी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांना सम्पर्क साधला मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.

 

डिसेंम्बर महिन्यात अस्वल थेट शहरात दाखल झाली होती, आता पुन्हा अस्वल शहरात येत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!