वाघाला बघून बिबट्याला आला हार्ट अटॅक?

News34 chandrapur

तळोधी बाळापूर – वर्ष 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 7 वाघाचा विविध कारणांनी मृत्यू झाला होता, आता नव्या वर्षात ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वन कर्मचारी कॅमेरा ट्रॅप चे फोटो चेक करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली, परिसरात बघितले तर एका झाडावर 20 ते 30 फूट उंचीवर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

 

 

घटनेची माहिती तळोधी बाळापुर वन परिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताचं वन अधिकारी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून त्या बिबट्याला खाली उतरविले.

 

सदर मृत बिबट ही साडेतीन ते चार वर्षे वयाचा मादा बिबट असल्याचे लक्षात आले. व घटनास्थळावरून हे बिबटमृत झाल्याची घटनाही पाच ते सहा दिवसापूर्वी घडल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीनुसार लक्षात आले. सदर परिसराची चौकशी केली असता ज्या झाडावर हा बिबट मेलेला होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याचे, मार्किंग केल्याचे व झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले. त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाईघाईने चढला व चढल्यानंतर हृदय घाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

मोक्का पंचनामा केल्यानंतर विच्छेदनासाठी ब्रह्मपुरी वन विभागाच्या ऑफिसला पाठविण्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!