News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा शहर कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, विदर्भ किसान मजदूर कांग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांचं आज 9 जानेवारीला सकाळी निधन झाले.
चंद्रपुरात गावंडे गुरुजी म्हणून सर्वाना परिचित होते, नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी राजकारणात सक्रियपणे सहभाग नोंदविला होता, काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते, आजारावर उपचार झाला घरी आले मात्र आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली, त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
गावंडे गुरुजी हे 77 वर्षाचे होते, त्यांच्या जाण्याने गावंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.