News34 chandrapur
चंद्रपूर – निकालाच्या सत्ता संघर्षानंतर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे आहेत अशाच प्रकारच आंदोलन चंद्रपुरात आज शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे.
यावेळी केंद्र सरकार, शिवसेना शिंदे गट व विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे व त्याचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जर शिवसेनेची 2018 ची घटना नार्वेकर यांना मान्य नसेल तर त्याच घटनेच्या आधारे पक्ष प्रमुखाने दिलेल्या A .B फॉर्म घेऊनच शिंदे व त्याचे आमदार निवडून आले आहे, तर ते घटना बाह्य नाही का? असा थेट प्रश्न विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालावर आम्ही उपस्थित करतो ..संदिप गिऱ्हे शिवसेना जिल्हा प्रमुख