News34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल – भारतिय स्त्री शिक्षणाची जननी पहिली शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी सकल माळी समाजातर्फे अनेक संघटनांच्या नेतृत्वात मोठ्या थाटामाटात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
दुपारी १ वाजता वॉर्ड न.२ मधून लेझिमच्या नृत्यतालावर निघालेली सन्मान रॅली मुल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीत महिला पुरुष युवक युवती अंदाजे २५०० च्या संख्येने सहभागी झाले होते. ३ वाजता तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार मुल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सायंकाळी ४ वाजता मोठा माळी मोहल्ला येथील भव्य पटांगणावर प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जी.प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले व अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे, मार्गदर्शक माजी जी.प.सदस्य प्रा.रामभाऊ महाडोरे, विशेष अतिथी बाजार समिती संचालक व उद्योजक हसन वाढई, प्रमुख अतिथी समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, एड.राजश्री ठाकरे, माजी नगर सेविका शंताताई मांदाडे, नेफडो विभागीय अध्यक्ष रत्नाताई चौधरी, अभियंता रुपेश निकोडे, सामाजिक युवा कार्यकर्ते राकेश मोहुरले, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या कुटुंबाची व समाजाची आर्थिक उन्नती करायची असेल तर आपल्यातले असलेले दुर्गुण व्यसन बंद करुन शेतीला जोड म्हणून छोटे मोठे व्यवसाय करावे असे मौलिक विचार कार्यक्रमाचे उद्घाटक संध्याताई गुरनुले यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी ओबीसी आरक्षण, जात निहाय जनगणना करावी, शासन शिक्षणाचे दार बंद करीत असून पुढे कोणी शिक्षणच घेऊ नये, असा चुकीचा विचार शासन करीत असल्याचे सांगितले.
तर मार्गदर्शक प्रा. रामभाऊ महाडोरे यांनी समाज बांधवांनी एकच कार्यक्रम घेऊन समाज एकतेचा संदेश जनतेला दिल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.विजय लोनबले,गुरु गुरनुले, प्रसिद्ध सर्जन संजय घाटे, एड.राजश्री ठाकरे, रत्ना चौधरी, यांनीही सावित्रीच्या जीवनावर प्रकाश टाकला. यानिमित्त माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, उत्कृष्ठ लेझिमचे संचलन कर्ते जितेंद्र लेनगुरे (शिक्षक) व सहकारी चित्तरंजन वाढई यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव मांदाडे यांनी केले. संचालन प्रकाश शेंडे यांनी केले.
संयोजन बाळा निकोडे, सौरभ वाढई, रिंकेश मांदाडे, राजू शेंडे,बालाजी लेनगुरे,मुकेश लोनबले, चित्तरंजन वाढई, राकेश ठाकरे, विवेक मांदाडे, नामदेव वाढई,विकास निकोडे,अनिल चौधरी,विजय गुरनुले,विनोद मोहरले, अजय गुरनुले,यांनी केले.तर आर्थिक सहकार्यासाठी बंडू गुरनुले,चंदू चटारे,जितेंद्र लेंनगूरे,राकेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.समस्त समाज बांधवांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.