ज्यांचे मोठे घर त्यानाचं मिळाले घरकुल

News34 chandrapur

गुरू गुरनुले 

मुल – केंद्र सरकार गरीब व गरजु लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असताना माञ गावातील सरपंच यांनी चक्क नातेवाईक व धनधांडग्याना लाभ देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप सिंतळा येथील जनतेनी केला आहे.

 

पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या सिंतळा येथील गरीब व गरजू लोकांना नमो घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक पात्र असलेल्यानी प्रयत्न केला मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सरपंच आपली मनमानी कारभार करून पात्र असलेल्या अनेकांना डावलून आपल्या नातेवाईक व आर्थिक दृष्टया सक्षम असेलल्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावात होणारी ग्रामसभा नाममात्र घेवुन कुठल्याही आपल्या मर्जीतील लाभ दिला जात आहे.

 

त्यामुळे अनेक जण घरकुल योजनेपासुन वंचित होताना दिसत आहेत.तरी देखील तहकुब झालेल्या ग्रामसभेत सरपंच, सचिव व सदस्यांनी नमो घरकुल योजनेच्या यादीत हेराफेरी करून स्वतःच्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट केल्याचा आरोप ग्रामस्थांनानी केला आहे. गावात अनेक जणांचे पडके घरे असताना वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

याबाबत चौकशी करून खऱ्या लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करावा अशी आर्त हाक पंचायत समिती मूल चे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आली असून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी अशी मागणी कांग्रेस नेते सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी सरपंच जनार्दन भूरसे, व गावातील अन्याय ग्रस्त नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!