News34 chandrapur
चंद्रपूर – गणतंत्र दिवसाच्या पूर्व संध्येला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी त्याच्या सरकार नगर येथील राहत्या घरी जात कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधत महत्वपूर्ण सूचना केल्या आहे. यावेळी कॉंग्रस नेत्या चित्रा धांगे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, शिवसेना महानगर प्रमुख भरत गुप्ता, यांची उपस्थिती होती.
गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शिवा वझरकर सरकार नगर येथे अग्रवाल कोचिंग क्लासेसजवळ एकाला भेटायला गेला होता. तिथे दोघांमध्ये चर्चा सुरू असताना आरोपी घटनास्थळी आला व शिवा वझरकर यांच्यावर चाकूने वार केले. यात वझरकर गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला गंभीर अवस्थेत सरकार नगर येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरने मृत घोषित केले. या घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी घडलेल्या घटनेची संपुर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र सिंह परदेसी यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधत संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. चंद्रपूर शहर शांत आहे. ही शांतता अबाधित राहिली पाहिजे. आपण या प्रकरणाची उच्च अधिकार्याकडून चौकशी करावी यासह अनेक महत्वपूर्ण सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक यांना केल्या आहे.