रस्त्याचे निकृष्ट काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख संतापले

News34 chandrapur

चंद्रपूर – बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर, नांदगाव व माना या गावालगत सध्या रस्त्याच्या दुरुस्ती करण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून सदर काम तात्काळ थांबवा अशी मागणी शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांनी केली आहे.

 

या मार्गावरून शेतकरी, शेतमंजूर रात्रदिवस ये जा करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या रस्त्याचे विसापूर, नांदगाव पोडे ते माना गावापर्यत खडिकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण असलेल्या रोड ला पुन्हा नव्याने 3 कोटी 50 लाख मंजूर करून त्या रोड वरती नवीन खडिकरण, मजबुतीकरण न करता सरळ त्या वरती गिट्टी टाकून फक्त डांबर टाकत रोड चे काम करत आहेत व अश्या पद्धतीने काही राजकारणी लोक, इंजिनिअर आणि ठेकेदार एकसंघमत करून शासनाचा 3 करोड 50 लाख निधी लंपास करत आहे हे काम लवकरात लवकर बंद करावे, सदर काम बघून युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले चांगलेच संतापले होते.

 

या सर्व कामाची पालक मंत्री साहेबांनी चौकशी करावी असे पत्र सुद्धा आम्ही देणार आहोत व जे यामध्ये दोषी आढळतील त्यांच्या वरती कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणी सुर्या अडबाले यांनी केली आहे.

 

यावेळी मनसे चे तालुका प्रमुख राज वर्मा मनसे चंद्रपूर, शहर उपप्रमुख कैलास जी वालकोडे, संतोष जी येमूरले मनसे शाखा अध्यक्ष प्रमोद जी निखाडे, प्रशांत पिंपळशेडे, शंकर उईके आदि गावकरी हजर होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!