चंद्रपुर कृषी महोत्सवात आमदार जोरगेवार प्रशासनावर संतापले

News34 chandrapur

चंद्रपूर – 3 जानेवारीला चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंड येथे कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चांदा ऍग्रो 2024 कृषी महोत्सवाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनपर भाषनानंतर आमदार जोरगेवार यांनी मार्गदर्शन केले मात्र प्रशासनावर यावेळी ते प्रचंड नाराज होत, मला दुसऱ्यांदा कार्यक्रमाला बोलवायचे नाही असे म्हणत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली, मला वेळेवर भाषणाला बोलविता हे चुकीचे आहे, बाबासाहेबांनी सर्वाना समान अधिकार दिला आहे मात्र आपल्या अश्या वागणुकीमुळे माझ्या मतदार संघातील नागरिकांचा हा अपमान आहे.

 

राज्यात सर्वात जास्त बहुमताने निवडून आलेला मी आमदार आहो, मी 5 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो, जर माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करता तर मला वेळेवर भाषणाला का सांगता, असे असेल तर मला पुन्हा कार्यक्रमाला बोलावू नका.

 

यापूर्वी आमदार जोरगेवार यांचा झाला अपमान..

अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातील विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व मागील 4 वर्षांपासून आमदार जोरगेवार करीत आहे, मात्र यापूर्वी जेव्हाही प्रशासनाने कार्यक्रम घेईल त्यावेळी सुद्धा जोरगेवार यांचा अपमान करीत शिष्टाचाराचे भंग शासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे, मात्र वारंवार होणारा आमदार जोरगेवार यांचा हा अपमान राजकीय वृत्तीला तर प्रेरित नाही न असा प्रश्न नेहमी नागरिकांना पडत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!