Monday, June 17, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

गरजूंना विविध साहित्याचे वाटप

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर व राजूरा विधानसभा क्षेत्रात युवासेनेची मोठी फळी विक्रांत सहारे यांनी अवघ्या काही महिन्यात निर्माण केली, 2 जानेवारी ला सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला कक्षातील नवजात मुलांना 50 बेबीकीट चे वितरण यावेळी करण्यात आले.

 

महाकाली मंदिर, वरोरा नाका चौकात रात्री च्या सुमारास कुडकूडणाऱ्या थंडीत रात्र घालविणाऱ्या 100 नागरिकांमध्ये ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

 

आयोजित कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, पवन नगराळे, वसीम शेख, युवासेनेचे शहर प्रमुख शिवा वझरकर, शाहबाज शेख, विकास विरुटकर, सुस्मित गौरकार, बंटी कमटम, सिनाळा गावातील उपसरपंच सूरज शेंडे, अनिकेत चंदनखेडे, शुभम बेलके, निलेश पराते यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!