Scam worth lakhs in Chandrapur : चंद्रपुरातील या पतसंस्थेत 49 लाखांची अफरातफर

News34 chandrapur

चंद्रपूर – दैनंदिन आर्वती ठेव, आरडी खाते उघडत नागरिक आपल्या मेहनतीचे पैसे बँक किंवा पतसंस्थेत जमा करतात मात्र त्यांच्या पैश्यावर पतसंस्थेतील संचालक, अध्यक्ष हे डल्ला मारतात, असाच एक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. या पतसंस्थेत तब्बल 48 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. Cooperative Credit Institutions

 

 

फिर्यादी रमणकुमार निमकर, सनदी लेखापाल यांचे लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे. रामनगर जिल्हा चंद्रपूर येथे अपराध क्रमांक २११/२०२३ कलम- ४०६,४०९, ४२०,३४ भा. द. वि. सहकलम ३ महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर रजिस्टर नंबर १५४ मधील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ, कर्मचारी, अभिकर्ता / एजंट नामे १) राजाराम तुकाराम भडके, व्यवस्थापक २) गौतम केशम जीवने, अध्यक्ष ३) अजित राजाराम भडके, उपाध्यक्ष ४) विवेक आत्माराम नळे, संचालक ५) लोकचंद रेदुलील लिव्हारे, संचालक ६) देवराव राघोबा पिंपळकर, संचालक ७) सुभद्रा अनिल निरापुरे, संचालक ८) गीता वासुदेव दास, संचालिका ९) गीता विजय पालनवार, संचालिका १०) रवींद्र दामोदर बारेकर, अभिकर्ता/ लिपिक यांनी दिनांक ०१.०४.२०१९ ते दिनांक ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये ४९,४८,१७८/- रुपयांचा गैरव्यवहार तथा अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे. Chandrapur scam

 

 

सदर संस्थेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दैनंदिन ठेव, आवर्ती ठेव व मुदत ठेव अशा योजनेमध्ये रकमेची गुंतवणूक केलेली आहे परंतु सदर पतसंस्थेकडून गुंतवणूकदारांची रक्कम परत केलेली नाही अशा गुंतवणूकदारांच्या रकमेच्या याद्या तयार करणे सुरू आहेत.

 

तरी ज्या गुंतवणूकदारांनी रक्कम परत मिळाली नाही अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे कागदपत्र (गुंतवणुकीचे एफ डी सर्टिफिकेट, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे आहेत त्या बँक खात्याचे पासबुकच्या प्रथम पाण्याची झेरॉक्स प्रत) इत्यादी माहितीसह परिशिष्ट १ प्रमाणे फार्म भरून देणे करिता आर्थिक गुन्हे शाखा पो.स्टे. दुर्गापूर परिसर पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक ०१-०२- २०२४ ते दिनांक १०-०२-२०२४ दरम्यान यावे. याकरिता अशी बातमी सर्व वर्तमानपत्र सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!