Thursday, May 23, 2024
Homeचंद्रपूर शहरIPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची...

IPS Transfer : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस अधीक्षक पदी आयपीएस अधिकाऱ्यांची एंट्री

गुन्हेगारी सत्र थांबणार?

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे वाऱ्यावर गेली आहे, त्यांतच चंद्रपूर जिल्ह्यात प्रोमोटेड पोलीस अधीक्षक आले, मात्र आता अनेक वर्षांनी जिल्ह्यात तरुण IPS ची एंट्री होणार आहे. IPS transfer

 

गृह विभागाने आज राज्यातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले त्यामध्ये चंद्रपूर पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांची बदली परभणी जिल्ह्यात झाली, आता चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर शहर उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची वर्णी लागली आहे. Chandrapur ips transfer

 

मागील पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ बघता जिल्ह्यात गुन्हेगारी मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढली, गोळीबार, खून व संघटित गुन्हेगारीने जिल्ह्यात डोकं वर काढलं आहे, अनेक पोलीस अधीक्षकांनी यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला मात्र आजही सर्व अनियंत्रित आहे, अश्यात चंद्रपूर जिल्ह्यात आयपीएस अधिकारी मुमक्का सुदर्शन यांची एंट्री होत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!