News34 chandrapur
चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. Tadoba tiger project
छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल 25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व 14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38 हजार 900 रुपये पाठविले होते. Jungle safari
काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. Online booking
27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता काही तासात आरोपी केयुज कडुकर ला अटक करण्यात आली.
पोलीस तपासात कडुकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांचीसुद्धा अश्याच प्रकारे फसवणूक केली होती, फिर्यादी बावसकर व वाजपेयी यांची कडुकर यांनी बुकिंग च्या नावाखाली तब्बल 66 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली, पोलिसांनी आरोपी कडुकर यांच्यावर कलम 420, 66(ड) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनव्ये गुन्हा दाखल केला.
याबाबत वनविभाग सध्या काही बोलायला तयार नाही, मात्र आरोपी केयुज कडुकर यांचे 5 वर्षांपूर्वी ताडोबा येथे होम स्टे होते, मात्र त्यांच्या बोगस कामामुळे वनविभागाने कडुकर यांचे होम स्टे बंद केले होते, त्यांनतर सुद्धा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांशी ओळखी करीत पुन्हा ताडोबा मध्ये यायचं असेल तर मला सम्पर्क करा मी सफारी बुकिंग करतो असे दर्शवायचा.
सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसरपे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.