News34 chandrapur
चंद्रपूर – महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील शेतकरी त्यांच्या कापूस खरेदीच्या हमीभावाच्या प्रश्नाला तोंड देत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांनी हा मुद्दा उपस्थित करून उत्तरे मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या धोरणानुसार जिनिंगधारकांना शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस खरेदी करणे बंधनकारक आहे. Cotton purchases
मात्र, प्रत्यक्षात या धोरणाची चंद्रपुरात प्रभावी अंमलबजावणी होत नाही. परिणामी, हमीभावाने कापूस खरेदी करण्यास इच्छुक असलेले जिनिंगधारक शोधण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे, कारण ते त्यांच्या कापूस उत्पादनाला योग्य किंमत देऊ शकत नाहीत. Gining holder’s
चंद्रपुर तालुक्यातील घुग्गूस येथील रिद्धी-सिद्धी जिनिंग मध्ये कापूस हमीभावाने घेत नसल्याने 14 फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले शेतकऱ्यांसोबत जिनिंग वर धडकले. Swabhimani farmer’s association
सकाळपासून जिनिंग समोर शेतकऱ्यांचे कापसाचे वाहन थांबले होते, याबाबत अडबाले यांनी जिनिंग मालकासोबत चर्चा केली असता ते म्हणाले की आम्हला इतर जिनिंग मध्ये काय रेट आहे त्याबाबत माहिती आली की आम्ही कापूस खरेदी करू.
7 हजार 20 रुपये ही किंमत शासनाने ठरवून दिली आहे मात्र जिनिंग धारक कापूस 6 हजार 500 रुपयांना कापूस खरेदी करीत आहे.
जिनिंग मालक व सुपरवायझर यांना कापूस हमीभावाने का घेत नाही असा प्रश्न अडबाले यांनी यावेळी विचारला असता ते यावर काही बोलायला तयार नव्हते.
शासनाने कापूस हमीभावाने खरेदी करावा असे धोरण आखले असताना सुद्धा जिनिंग मालक शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करीत आहे, जर असेच सुरू राहीले तर आम्ही भविष्यात आंदोलन उभे करू असा इशारा अडबाले यांनी यावेळी दिली.