Chandrapur Crime News : MBA FINALचे शिक्षण घेणारा युवक निघाला दुचाकी चोर

News34 chandrapur

चंद्रपूर – आई-वडील दिवस रात्र काबाडकष्ट करीत मुलांना शिकवितात मात्र काही मुले शिक्षणासहित चुकीच्या वळणावर जातात, असाच एक उच्च शिक्षित तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे, दुचाकी चोरी प्रकरणात MBA FINAL चे शिक्षण घेत असलेला उच्च शिक्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Crime news

 

 

जिल्ह्यात दुचाकी चोरी चे प्रकरण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई बाबत निर्देश दिले.

 

 

पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत तपास सुरू केला, त्याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी चोरी झाली होती.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे 25 वर्षीय तरुण विना कागदपत्रांची दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी आला आहे.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तरुणाला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर दुचाकी वाहन हे चोरी केले असल्याची त्याने कबुली दिली.

 

25 वर्षीय आशिष रहांगडाले रा. अष्टभुजा चंद्रपूर असे दुचाकी चोराचे नाव आहे, सदर आरोपी हा नागपुरातील एका महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

आरोपीला शेअर मार्केट चा छंद आहे, मात्र त्या छंदात त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाले होते, म्हणून तो दुचाकी चोरी करायचा आणि त्याची विक्री करीत तो कर्ज फेडत होता.

 

 

आरोपी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 दुचाकी तर चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत 1 दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी जवळून ऍक्टिव्हा क्रमांक Mh34 BU7349, सिमेंट रंगांची एक्टिव्हा क्रमांक Mh29AG4781, काळ्या रंगाची स्पलेंडर क्रमांक Mh32S1335, एच एफ डीलक्स वाहन क्रमांक Mh34BJ5773 जप्त करण्यात आला असून एकूण 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीला रामनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

 

 

विशेष बाब म्हणजे वर्ष 2023 मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 51 दुचाकी वाहने जप्त केले.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, नागेश येलपुलवार व नितीन रायपुरे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!