Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपूर शहरHansraj Ahir : अयोध्येचा प्रसाद जेव्हा चंद्रपुरात आला

Hansraj Ahir : अयोध्येचा प्रसाद जेव्हा चंद्रपुरात आला

सुदर्शन समाज बांधवांसह प्रभू रामचंद्रांचे पुजन, प्रसाद वितरण व महाप्रसादाचा अभिनव कार्यक्रम

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : अयोध्येत प्रभु श्रीरामललांचे दर्शन घेतल्यानंतर या पुण्य, पवित्र नगरीतून आणलेल्या प्रसादाचे व प्रभु रामजींच्या मुर्तीचे धार्मिक मंत्रोच्चारात पूजन करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रामललांच्या चरणी श्रध्दासुमने अर्पित केली. Sudarshan samaj

 

 

स्थानिक दादमहल वार्डातील महर्षी सुदर्शन महाराज व वाल्मिकी ऋर्षीच्या मंदीरात दि. 05 फेब्रुवारी 2024 रोजी सुदर्शन समाज बांधव व भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने पवित्र प्रसाद व रामललांच्या मुर्तीचे पुजन आयोजित करण्यात आले होते. या धार्मिक उत्सवास सर्वस्वी विजय राऊत, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, राजेश मुन, अंजलीताई घोटेकर, सुदर्शन समाज अध्यक्ष दिलीप हजारे, रमेश भूते, रवी गुरुनुले, अॅड. आषिश मुंधडा, राजु अडपेवार, विनोद शेरकी, राजू घरोटे, दिनकर सोमलकर, मनिषा महातव, वंदना संतोषवार, पं. मयूराप्रसाद पांडे, बळीराम महातव, चंद्रशेखर मलीक, आनंद मलीक आदी मान्यवर उपस्थित होते. Ayodhya jai shri ram

 

 

या प्रसंगी सुदर्शन समाजातील ज्येष्ठ महिला व पुरुषांचा हंसराज अहीर यांनी शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. या प्रसादपुजन कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास राजू राठोड, मुन्ना मलिक, देवीदास हजारे, संजय निरके, गणेश मारवे, सुनिल महातव, राज बिरीया, अरविंद बकसरीया, मोनो मलिक, प्रल्हाद हजारे, बादल मलिक, करण मलिक, अमित राठोड, राकेश हजारे, तिलक सिकलवार, श्याम व्यास, ब्रिजेश हजारे, राजेश हजारे, मुकेश हजारे, सचिन हजारे, राज हजारे, रामू मतेलकर, शांताबाई मलिक, कमलाबाई मलिक, रजनी हजारे, गंगाबाई हजारे, बबली मतेल, अनिता शिरके, शैलेष इंगोले, रवी चहारे, प्रदिप किरमे, गणेश गेडाम, प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर, चंद्रकला सोयाम, वंदना जांभूळकर, शितल आत्राम, अॅड. सुरेश तालेवार, विठ्ठल डुकरे, बाळू कोतपल्लीवार, अॅड. हरीष मंचलवार, रेणुकाताई घोडेस्वार, शालू कन्नोजवार, मुग्धा खांडे, नकुल आचार्य, श्याम बोबडे, मधुकर राऊत, सुभाष आदमने, प्रसाद काटपाताल, शेंद्रे सर, सुरज खोटे, राहूल मारवे, भिम मलिक, अमित राठोड, विजेश हजारे, राकेश हजारे, यांचेसह सुदर्शन समाज बांधव व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोनीषा महातव यांनी केले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!