Chandrapur Shocking News : 15 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

News34 chandrapur

चंद्रपूर – तालुक्यातील घुग्घुस येथे 15 वर्षीय मुलीने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, दिव्या रामलाल रहिदास असे मृत मुलीचे नाव आहे.

 

 

शहरातील वेकोली कॉलनी रामनगर येथे राहणारी दिव्या आज दुपारच्या सुमारास घरी होती, कुटुंबियाने दिव्या ला जेवण करण्यास सांगितले असता ती आपल्या रूम मध्ये गेली, बराच वेळ झाल्याने ती बाहेर आली नाही, कुटुंबियांना संशय येताच त्यांनी दार ठोठावले मात्र दिव्या ने काही प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडत प्रवेश केला असता दिव्या गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळली.

 

 

दिव्या ने ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली, कुटुंबियाने तात्काळ दिव्या ला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण सध्या अस्पष्ट आहे, घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!