Humanity of Vijay Vadettiwar ब्रह्मपुरी – 3 फेब्रुवारीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात दौऱ्यावर होते, अतिव्यस्त कार्यक्रम आटोपून ते विधानसभेत पुढच्या दौऱ्यावर निघाले असता एक अपघात घडला मात्र विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आपले वाहन थांबवित त्या अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचविले.
गावातच बिबट्याने घेतला आश्रय, आणि एका घरी बछड्याना दिला जन्म
Humanity of vijay vadettiwar नागभीड- ब्रम्हपुरी रस्त्यावर रात्री 8 वाजता दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला, या अपघातात गंभीर झालेल्या व्यक्तीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मदत करीत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्याचे आदेश दिले.
त्यामुळे अपघात ग्रस्त व्यक्तीला त्वरित उपचार मिळाल्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचे जीव वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे.
विरोधीपक्ष नेते व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे नाव जनसामान्य नागरिकांचे परिचयाचे नाव आहे, विधानसभा क्षेत्रात काही घडलं तर त्यांच्या मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे विजय वडेट्टीवार, नागरिक जेव्हा न्यायाची अपेक्षा घेऊन वडेट्टीवार यांच्याकडे येतात त्यावेळी ते अमीर श्रीमंत न बघता तो मानसिक त्रासाने खचला आहे आधी त्याला आधार देत त्याला न्याय मिळवून देण्याचे काम वडेट्टीवार करीत असतात.
त्यामुळे दौऱ्यावर असताना एक अपघात घडतो आणि त्याच क्षणी वडेट्टीवार यांना त्याबाबत माहिती मिळते, मात्र ते दौरे थांबवित आधी मदतिला धावतात, त्यांच्या कार्याची शैली ही नेत्यांपेक्षा वेगळी असते, मनात कसलाही भेदभाव न करता ते आधी मदत करतात हे विशेष.