News34 chandrapur
गोंडपीपरी – विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज 8 फेब्रुवारीला महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, सदर आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. Independent vidarbha
गुरुवारी दुपारी गोंडपीपरी तालुक्यातील पोळसा पुलावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर माजी आमदार वामनराव चटप व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन विविध मागण्यांसाठी केले.
या आंदोलनात प्रमुख मागण्या स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, विजेची दरवाढ तात्काळ राज्यशासनाने मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसा लोडशेडिंग बंद करावी, विदर्भात येणारे 2 औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाच्या बाहेर न्यावे, वैधानिक विकास महामंडळ नको विदर्भ राज्य हवे, अन्न धान्यावरील GST रद्द करावी, बल्लारपूर-सुरजागड रेल्वे मार्गाला मंजुरी देत निधी उपलब्ध करावा अश्या विविध मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने रस्ता रोको आंदोलन केले.