News34 chandrapur
राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर – राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजग, व्यापारी अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा अर्थसंकल्प राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा असल्याचे अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. Mla kishor jorgewar
सरकार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करित आहे. याचाच प्रत्यय पुन्हा अर्थसंकल्पातून आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांना स्वयंरोजागारातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी मतदार संघात आपण ग्रीन आटो संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील होतो, आता या अर्थसंकल्पात 5 हजार महिलांना पिंक रिक्षा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. State budget
त्यामुळे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक उन्नती सह महिला सुरक्षेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे. रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये, जिल्हा वार्षीय योजनेसाठी 18 हजार 165 कोटी रुपयांची तरदुत अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.18 लघु-वस्त्रोद्योग संकुल स्थापन करुन सुमारे 36 हजार रोजगार निर्मिती करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलसीस सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. एंकदरित विचार केल्यास समाजातील सर्व घटकाला स्पर्श करुन न्याय देणारा राज्यहिताचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. Finance minister ajit pawar
शाळांचा विकास आणि शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करणारा “बजेट”
आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शैक्षणिक क्षेत्रासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. शाळांचा विकास आणि शैक्षणिक सुविधांसाठीही या अर्थसंकल्पात अंतर्भाव दिसून येत नाही. अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढ देण्यात आले नाही. शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न असलेल्या जुन्या पेंशनबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. आय टी शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत कुठलीही तरतूद या अर्थ संकल्पात करण्यात आलेली नाही.
– सुधाकर अडबाले, आमदार
महाराष्ट्र विधान परिषद
सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांसाठी कोणतिही मोठी तरतूद केलेली नाही. युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ घोषणाबाजी अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प आहे.
– रितेश (रामू) तिवारी,
जिल्हाध्यक्ष
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले. मात्र, चंद्रपूरसारख्या प्रदूषित जिल्ह्यासाठी शुद्ध हवा, पर्यावरण आणि इरई नदी खोलीकरण आणि पूरग्रस्त स्थिती कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कोणतीही ठोस तरदूत करण्यात आली नाही. या शिवाय राज्यातील शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी कोणतीही निधीची तरतूद नाही. त्यामुळे गरीब विद्यार्थ्याची पिळवणूक होईल.
बहुजनांचे प्रतिनिधी
श्री. राजेश वारलुजी बेले
अध्यक्ष | संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था
चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा निवडणूक 2024