Maharashtra state budget चंद्रपूर – आज महाराष्ट्र राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला मात्र हा अर्थसंकल्प केवळ केंद्रावर स्तुतीसुमने उधळण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.
अवश्य वाचा : डेंग्यू चा बाजार सुरू होण्यापूर्वी मनपाने केली कारवाई
Maharashtra state budget आज राज्याचा अर्थसंकल्प माननीय अजित दादा पवार यांच्याकडून मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात, अर्थसंकल्पातील तरतुदी कमी व मोदींची स्तुती जास्त असा हा अर्थसंकल्प दिसून येत आहे. समोरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला फसविण्याचा महायुतीचा डाव यातून दिसून येत आहे. बेरोजगारी शेतकरी, महिला याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीवर महायुती सरकार सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणार असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहे, त्यापूर्वी घोषणांचा बाजार या अर्थसंकल्पातून समोर आलेला आहे. महायुती सरकारने कितीही घोषणा केल्या तरी जनता यांना लोकसभा निवडणुकीत घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, राज्यातील व देशातील जनता भाजप व महायुती सरकारला मोठा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही, चांगल्या दिवसाचे स्वप्न नागरिकांना दाखवीत वाईट दिवसांची वाटचाल भाजपने नागरिकांना दाखवली, त्याच उत्तर सामान्य जनता निवडणुकीच्या वेळी दाखवून देणार हे नक्की आहे.
निवडणुकीपूर्वी कितीही घोषणा केल्या तरी त्या सर्व योजना जनता पायदळी नक्कीच तुडविणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अंतरिम अर्थसंकल्प बाबत दिली आहे.