Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाOBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली...

OBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी

महात्मा फुले समता परिषदेचा पुढाकार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – महाराष्ट्रात सर्वाधिक सकल ओबीसी समाजाची संख्या असताना मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्या गेले आहेत. त्यावेळी मराठ्यांनी कुठेही स्वतःच्या आरक्षणाबाबत मागणी केलेली नाही. याचे कारणही सबळ आहे.

 

मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे.उन्नत आहे. म्हणून आरक्षणाचा मुद्दा केंद्र व राज्य शासनासमोर पुढे केलेला नाही. आता मात्र ओबीसींना मिळणाऱ्या सवलती घेण्याच्या दृष्टीने ओबिसीमधे आपला समावेश करावा म्हणून जरांगे पाटलांना पुढे करुन आरक्षणासाठी रस्त्यावर उपोषण व आंदोलन सुरु केले. आणि मराठ्यांच्या आंदोलनाला राज्य शासन घाबरून म्हणा किंवा शासन करतेच मराठे असल्याने ओबीसी संवर्गातील समावेश असलेल्या असंख्य जातीचा विचार न करता ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचे अध्यादेश काढला.

 

 

हे न्यायाला धरुन नसून केवळ ओबीसींवर अन्याय करणारे आहे. करीता ओबीसीचे राष्ट्रीय नेते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात शासनाने नुकताच मराठ्यांच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला मसूद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात हरकती नोंद व मसुद्याची होळी करण्यासाठी मुल येथे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांचे नेतृत्वात सकल ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा काढून काढलेला अध्यादेश त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी असंख्य ओबीसी समाज बांधव व महिलांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी जी.प. सदस्य प्रा.रामभाऊ महादोरे, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, राकाचे तालुका अध्यक्ष प्रा. किसान वासाडे, डॉ.पद्माकर लेनगुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, प्रा.सुधीर नगोषे, ईश्वर लोनबले, राकेश मोहूर्ले, कैलाश चलाख, सीमा लोनबले,अमित राऊत,शमलता बेलसरे,समता बनसोड, यांचेसह समता परिषदेचे समस्त पदाधिकारी, शेकडो महिला युवक ओबीसी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!