Police Inspector Transfer : बल्लारपूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांनी स्वीकारला पदभार

News34 chandrapur

चंद्रपूर – घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांची बल्लारपूर पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागली आहे. Ballarpur police station

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली झाल्यावर आता आसिफ रजा यांनी पदभार सांभाळला आहे.

 

कोण आहेत आसिफ रजा?

घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये वर्षभरापूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून आसिफ रजा नियुक्त झाले होते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नियंत्रणात ठेवली होती,  त्यांची ओळख ही एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून आहे. Dabang police officer

 

बल्लारपूर शहरात अनेक अवैध धंदे सर्रासपणे चालतात, विशेष म्हणजे सुगंधित तंबाखू माफियाचा बल्लारपूर हा मोठा हब आहे, या ठिकाणाहून जिल्ह्यातील विविध भागात तंबाखूची तस्करी केल्या जाते, मात्र तंबाखू माफियावर राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर आजपर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही, आता पोलीस निरीक्षक रजा या मोठ्या तस्करीवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!