News34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल – 5 फेब्रुवारीला वसंतराव नाईक, राज्य कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) व्ही आय पी रोड ,धरमपेठ नागपूर येथिल सभागृहात यशवंत पंचायत राज अभियान सण 2020-21 आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वछ ग्राम स्पर्धेच्या या कार्यक्रमात ग्रा. पं. कोसंबी ने विभाग स्तरावर सर्वोकृष्ट कामगिरी बजावली या बद्दल ग्राम पंचायत कोसंबी ,ता मूल ,जि. चंद्रपूर ला रुपये 3 लाखाचे पारितोषिक पुरस्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी मॅडम विभागीय आयुक्त नागपूर या होत्या तर प्रमुख पाहुणे मा. कमल किशोर फुटाणे साहेब विभागीय उपायुक्त (विकास), मा.विवेक इलमे साहेब विभागीय उपायुक्त (आस्थापना), डॉ मिताली शेट्टी मॅडम संचालक वनामती ,मा. समीर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांचे उपस्थितीत आदर्श कोसंबी गावचे सरपंच रविंद्र किसन कामडी, सारिका गेडाम उपसरपंच,चंदाताई विनोद कामडी सदस्या तथा संचालक कृ.ऊ बा समिती मुल,अरुण चनफने साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.मुल, सुनिल कारडवार साहेब कृषी अधिकारी पं स. मुल,विपीन वाकडे ग्रामसेवक कोसंबी, सुरज आकनपल्लीवार माजी ग्रामसेवक, रोशनी मोहुलै सदस्या यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा .कमल किशोर फुटाणे सरांनी केले, आभार प्रदर्शन मा .विवेक इलमे सरांनी व सूत्र संचलन श्री दिनेश मसोदकर सरांनी केले .
सदर कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने पार पाडण्यासाठी मा.श्री छञपाल एस. पटले साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर व त्यांचे सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभले.
सदर पुरस्कार मिळाल्या बद्द्ल कोसंबी ग्रामवाशीय जणता बंधू भगिनींनी सर्वांचे आभार मानले.