कर थकवाल तर कारवाई अटळ, चंद्रपूर मनपाचे 14 पथक सज्ज

News34 chandrapur

चंद्रपूर – १,७१,८२६/-  रुपयांची थकबाकी असणाऱ्या सिव्हिल लाईन्स सिद्दी अपार्टमेंट मधील विदर्भ काँक्रीट प्रा.लि या गोडाऊनला तसेच सिव्हिल लाईन्स व वडगांव प्रभाग येथील २ फ्लॅट्सला मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

 

सील केलेल्या मालमत्ताधारकांना यापुर्वी अनेकदा कर भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे जप्तीपूर्वीची नोटीस सुद्धा देण्यात आली होती. त्यानंतरही मोठी मुदत मिळूनही त्यांच्याद्वारे कराचा भरणा करण्यात आला नव्हता. कर भरणा करण्याची जबाबदारी टाळल्यामुळे या मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे.

 

त्याचप्रमाणे दादमहल वॉर्ड,समाधी वॉर्ड,पठाणपुरा इत्यादी भागातील बंडू सातोकर,संजय केळझरकर,विनोद केळझरकर,पुष्प चहारे,देवराज चव्हाण,किसन वाकडे, जगन्नाथ अनेजा,गिरीधर करवाडे,तानाबाई खेडेकर, मधुकर चहारे,सीताराम जथाडे हे मालमत्ता धारक तर रयतवारी भागातील रेखा पाटील,रामदिन गोंड,राम आसरे,गरिबुद्दीन सिद्दीकी या 15 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा न केल्याने त्यांच्या नळ जोडणी खंडीत करण्यात आल्या आहेत तर अनेक मालमत्तांवर जप्तीपूर्वीची नोटीस लावण्यात आली आहे.

 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

 

 

काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!