Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाSave Democracy : 15 फेब्रुवारीला चंद्रपुरात प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

Save Democracy : 15 फेब्रुवारीला चंद्रपुरात प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान

भारतीय लोकशाही पुढील आव्हाने विषयावर जाहीर व्याख्यान

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – देशातील लोकशाही व संविधान हे धोक्यात आले आहे, ते वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे वक्तव्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. Shyam manav

 

श्याम मानव हे 14 व 15 फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, 14 फेब्रुवारीला भद्रावती येथे आम्ही भद्रावती कर यांच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात श्याम मानव उपस्थित राहणार आहे, 15 फेब्रुवारीला चंद्रपुरातील आम्ही चंद्रपूरकर यांच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात भारतीय लोकशाही पुढील आव्हाने याविषयावर श्याम मानव नागरिकांना संबोधित करतील.
आयोजित कार्यक्रमात विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहे. Public lecture

 

 

यावेळी श्याम मानव यांनी नागरिकांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

आयोजित पत्रकार परिषदेत आम्ही चंद्रपूरकर संयोजक एडवोकेट गोविंद भेंडारकर, उमाकांत धांडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!