News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेला गुन्हेगारी आलेख कमी व्हावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आज 13 फेब्रुवारीला सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. Chandrapur police
शहरातील अनेक दारू दुकानासमोर विविध ठिकाणी मद्यपी दारू पितात ज्यामुळे भांडणाचे प्रकार वाढतात, या भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते.
दारू दुकानाबाहेर असलेल्या मद्यपीचा अनेक महिला व मुलींना नाहक त्रास होतो, यामुळे गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आज स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे व पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्या नेतृत्वात शहरातील बंगाली कॅम्प, मूल रोड, रयतवारी कॉलरी, तुकुम भागात असणाऱ्या देशी दारू व वाईन शॉपी समोर मद्यपिंवर धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. Police live action
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.