Valentine Day Chandrapur : प्रेयसीचा लग्नास नकार प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल

News34 chandrapur

रमेश निषाद

बल्लारपूर :- येथील डॉ, राजेंद्र प्रसाद वॉर्ड मधील राहणारा अमित बालाजी चौहान (27)याचे प्रेम मेव्हणी सोबत होते दोघेही एकमेकांवर प्रेम करीत होते. Valentine day chandrapur

 

अमित ने प्रेयसी सोबत लग्न करण्याचे ठरविले होते पण त्याला प्रेयसिने लग्नास नकार दिला या कारणाने अमित 12 फेब्रुवारी रोजी कोणालाही न सांगता घरून निघून गेला.आणि जंगलात जात अमित ने गळफास घेत आत्महत्या केली. Lovers day

 

Psi गोविंद चाटे आपल्या चमू सोबत रात्री दीड वाजता पेट्रोलिंग करीत असतांना मेन रोड वर एक बाईक उभी दिसून आली त्यांनी पोलीस स्टेशन ला फोन करून गाडी क्रमांक MH-15-HF5409ही गाडी लवारीस अवस्था मध्ये उभी असल्याचे कळविले असता माहिती मिळाली की सदर होंडा शाईन गाडी ही अमित चौहान यांची आहे. Happy Valentine’s day 2024

 

अमित च्या कुटुंबियांशी सम्पर्क साधला असता अमित हा सकाळी घरून गाडी घेऊन निघून गेला होता मात्र तो अजूनही घरी परतला नाही असे मृतकाचे काका प्रसाद चौहान यांनी पोलीस स्टेशन ला कळविले.

 

मृतकाचे काका यांना सोबत घेऊन गाडी दाखविली आणि मेन रोड च्या आतमध्ये पाहणी केली असता 50मीटर चा आत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अमित दिसून आला. मृतक आपल्या काकाचा दुकानात टेलरिंग चे काम करीत होता. पुढील तपास ठाणेदार असिफ रजा यांच्या मार्गदर्शनात गोविंद चाटे करीत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!