Shiv jayanti : विद्यार्थ्यांनी हार न मानता अपयश पचवून स्पर्धा परीक्षेतून यशस्वी व्हावे – पोलीस निरीक्षक सुमित परतेकी

News34 chandrapur

गुरू गुरनुले
मुल – महाराष्ट्राचे आराध्यदैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नेफडो टीम मुल तर्फे स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ले मॉडेल प्रतिकृती बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करतांना मुल येथील पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांनी विद्यार्थ्यांनी हार न मानता अपयश पचऊन स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे. असे मौलिक मार्गदर्शन करतांना बोलत होते. Fortification Competition

 

स्पर्धा परीक्षेतूनच विद्यार्थ्यांचा आत्मबल वाढतं असतो असेही सांगितले. शिवाजी महाराजांनी संघर्ष करूनच रयतेचे राज्य मिळविले. या अभिनव कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राज्य उपाध्यक्ष तेजस्विनी नागोशे यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा व नियोजन याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्पर्धेत सात स्पर्धकांनी सहभाग घेतला असून गडकिल्ले प्रतिकृतीचे परिक्षण आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ पत्रकार तसेच जनसंपर्क आणि प्रसिद्धी प्रमुख नागपूर विभाग श्री. गुरु गुरनुले यांच्या आवारात करण्यात आले.

 

कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटक पो.नी.परतेकी मुल यांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. गुलाबाचे रोप देऊन परतेकी सर यांचे राजमलवार मॅडम,सोनवाणे सर ,सुपनेर सर,नागोसे सर,विप्लव चौधरी यांचे नेफडो टीमने स्वागत केले.

 

रत्ना चौधरी, गुरु गुरनुले, गुरुदास चौधरी,अल्का राजमलवार, मंगला सुंकरवार,शामला बेलसरे,बन्सोड यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजांचे पर्यावरण विषयक आज्ञापत्र,महाराजांची प्रजेबद्दलची आस्था, महाराजांचे जीवन चरित्र, आपल्या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती, महाराजांचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे हे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी महाराजांवरील गीत आणि भाषणं सादर केली.

 

 

सदर स्पर्धेमध्ये नवभारत विद्यालय मुल, नवभारत कन्या विद्यालय मुल, आणि बालविकास प्राथमिक शाळा मुल येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक नवभारत विद्यालय, द्वितीय क्रमांक बालविकास प्राथमिक शाळा आणि तृतीय क्रमांक नवभारत कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी पटकावला.संस्थेतर्फे विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि बुकपेन शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेतर्फे बुकपेन भेट देण्यात आले.

 

गडकिल्ले बनविण्याची स्पर्धेकरिता हेमंत सुपनेर सर, श्रीरंग नागोसे सर आणि विप्लव चौधरी परिक्षकाचे काम केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी गुरनुले, सुत्रसंचलन मिरा शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन नलिनी आडेपवार यांनी केले. कार्यक्रमाला श्रीरंग नागोसे, नंदा शेंडे, राधिका बुक्कावार,सीमा भसारकर, वर्षा लेंनगूरे, यांचेसह अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!