Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाWater Tax : 4 नागरिकांनी पाणी कर चुकवला...मनपाने केली धडक कारवाई

Water Tax : 4 नागरिकांनी पाणी कर चुकवला…मनपाने केली धडक कारवाई

चांदा रयतवारी येथील ४ नळधारकांची नळ जोडणी खंडित

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – करवसुली अधिक काळापासुन थकीत असल्याने व वारंवार सुचना देऊनही कराचा भरणा न केल्याने मनपा कर वसुली पथकातर्फे चांदा रयतवारी येथील ४ नळधारकांची नळ जोडणी खंडित करण्यात आली आहे. Water tax

 

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची अथवा नळ कनेक्शन खंडीत करण्याची  कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.  Broken faucet connection

कर वसूली मोहीमेदरम्यान चांदा रयतवारी येथील सुरजपाल यादव,संतोष आमटे,मालुबाई आमटे,नारायण आसोदा यांच्या मालकीच्या मालमत्तेवर कर अधिक काळापासुन थकीत असल्याचे आढळुन आले त्याचप्रमाणे सदर मालमत्ता धारकांना कर भरण्याबाबत वारंवार सुचना दिल्याचेही आढळून आले,मात्र थकबाकीदारांद्वारे कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.  Chandrapur municipal corporation

 

काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

 

करावा भरणा –   www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे. त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. तसेच  व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!