Shivsena Thackeray Group : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

News34 chandrapur

पोंभुर्णा : शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणावर व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत. शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरहे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात देवाडा बुज येथील असंख्य युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. Shivsena thackeray group

 

 

पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पक्षाचे ध्येयधोरणे व आज राजकारणात युवकांचा सहभाग अत्यन्त गरजेचे असल्याचे सांगितले.

 

 

पोम्भूर्ण तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी ज्यापद्धतीने शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत करीत आहे त्यासारखं आपल्याला सुद्धा शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करायचे असे असे स्पष्ट केले.

आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात असंख्य युवक उपस्थित होते.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!