Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक भाजीपाला विक्रेता व्यापाऱ्यांनी मनमर्जी वागत भाजीपाल्याची चिल्लर विक्री सुरू केली आहे, ते पूर्णतः नियमबाह्य आहे, त्या चिल्लर विक्रीमुळे गंजवार्ड येथील भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

 

ठोक व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद न केल्यास गंजवार्ड येथील भाजी विक्रेता संघटना 12 फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा 9 फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सदर चिल्लर विक्री ही ठोक व्यापारी व बाजार समिती संचालकांनी सुरू केली आहे.

 

 

चंद्रपुरात आता ठोक व चिल्लर भाजी विक्रेत्यांचा वाद येणाऱ्या काळात वाढणार असल्याची चिन्हे आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!