Wild Bear चंद्रपूर – 9 फेब्रुवारीला मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास दुर्गापूर येथील वेकोली कॉलोनी शक्तीनगर भागात अस्वलीने आपल्या 2 पिल्लांसहित एंट्री मारली.
Wild bear मागील अनेक दिवसांपासून चंद्रपुरात अस्वलीचा मुक्तसंचार बघायला मिळत आहे, याआधी लालपेठ, अंचलेश्वर मंदिर, भिवापूर वार्ड येथील सुपर मार्केट मध्ये अस्वलीने धुमाकूळ घातला होता, त्यांनतर आता दुर्गापुरातील शक्तीनगर वेकोली वसाहतीमध्ये तब्बल 3 अस्वलीने नागरिकांना दर्शन दिले. त्यामुळे नागरिकही आता दहशतीमध्ये आले आहे.
दिवसेंदिवस वन्यप्राणी शहरात येण्याचे प्रमाण वाढत आहे, वेळीस यावर वनविभागाने नियंत्रण न मिळविल्यास येणाऱ्या काळात हे प्रमाण नक्की वाढणार.
चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभेत भाजपचा विजय होणार
चंद्रपूर जिल्हा चारही बाजूने जंगलाने वेढलेला आहे, प्राण्यांचे अधिवास वाढत असल्याने आता प्राणी थेट शहरात येत आहे, ग्रामीण भागात मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मागील 2 वर्षात या संघर्षात असंख्य नागरिकांचा बळी गेला.
ताडोबा अभयारण्यात वाघांची संख्या आवाक्याबाहेर गेली आहे, दरवर्षी लाखो पर्यटक वाघ बघायला ताडोबा येथे येत असतात, कोअर व बफर मध्ये जितके वाघ आहे त्यापेक्षा जास्त वाघ हे जंगलाच्या बाहेर फिरत असतात, ग्रामीण भागात जनावरे हे त्यांचे पौष्टिक खाद्य आहे त्यामुळे ते सहज शहराकडे येत असतात.
दुर्गापूर भागात काही अंतरापासून ताडोबा अभयारण्याची सुरुवात होते, औष्णिक वीज प्रकल्प परिसरात सुद्धा आजवर अनेक वन्यप्राणी येऊन गेले, प्राण्यांना शहरात येण्यापासुन कुणीही थांबवू शकत नाही. वाघ, बिबट नंतर आता अस्वल शहरात मुक्त संचार करताना दिसून येत आहे.