Thursday, April 25, 2024
Homeगुन्हेगारीAccused arrested due to Google history : चंद्रपुरात पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास

Accused arrested due to Google history : चंद्रपुरात पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास

- Advertisement -
- Advertisement -

Accused arrested due to Google history शहरातील सिंधी कॉलोनी परिसरात 15 ते 18 मार्च दरम्यान अडवाणी यांच्या घरातून 26 लाख रुपयांची रोख रक्कम चोरी झाली होती, सदर प्रकरणातील आरोपी हा गुगल हिस्ट्रीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

 

शहरातील सिंधी कॉलोनी रहिवासी 38 वर्षीय खुशाल भागचंद अडवाणी हे 15 मार्च ला विजयवाडा आंध्रप्रदेश येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते, 18 मार्च ला अडवाणी चंद्रपुरात परतले असता ते सामानाची बॅग बेडरूममध्ये ठेवण्याकरिता गेले असता त्याठिकाणी असलेली खिडकीचे ग्रील तुटलेले होते. Accused arrested due to Google history

वाचा – विजय वडेट्टीवार विरोधात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक

अडवाणी यांनी घरातील अलमारी बघितली असता अलमारी मध्ये ठेवलेली 26 लाखांची रोख रक्कम गहाळ करण्यात आली होती.

 

अडवाणी यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदविली, पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने घटनास्थळी धडक देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. Accused arrested due to Google history

 

गोपनीय बातमीदार व तांत्रिक पद्धतीने तपास केला असता एका मोबाईल हिस्ट्रीमुळे अखेर आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

 

गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथील निवासी 32 वर्षीय विकास महादेव गोंधळी सध्या मुक्काम फिर्यादी यांच्या घरी, याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने रोख रक्कम चोरली असल्याची कबुली दिली.

 

असा आला गुन्हा उघडकीस

रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ज्यावेळी अडवाणी यांच्या घरी पोहचली असता आरोपी विकास गोंधळी त्याठिकाणी त्यांना परिसराची माहिती देत होता, पोलिसांना त्याच्या सांगण्यावर काही संशय आला, तो मोबाईल आपल्या हातात ठेवत वावरत होता, पोलिसांनी त्याचा मोबाईल मागत तपासला असता त्याने गुगल वर ग्रील कापण्यासाठी काय वापरावे असे सर्च केले होते. Accused arrested due to Google history

 

गुगल च्या हिस्ट्री मुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला, आरोपीने 26 लाख रुपयांची रोकड सासू च्या घरी ठेवली होती.

 

आरोपी कडून 26 लाख रोख, ईलेक्टरीक कटर मशीन, सिपी प्लस कंपनीचा डिव्हीआर, लोखंडी छन्नी, पकड असलेले कटरे, एक्सटेन्शन बोर्ड असा एकूण 26 लाख 6 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Accused arrested due to Google history

 

पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, रामनगर चे सपोनि देवाजी नरोटे, पोउपनी मधुकर सामलवार, पोउपनी दीपेश ठाकरे, पेतरस सिडाम, किशोर वैरागडे, संजय आतकुलवार, संतोष एलपूलवार, लालू यादव यांनी केली.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!