Congress workers will resign en masse : चंद्रपुरात कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक, राजीनामे देणार

Congress workers will resign en masse चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने उमेदवारी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली मात्र कांग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे.

 

 

कांग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी मात्र ऐनवेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मुलीचे नाव समोर केले. Congress workers will resign en masse

 

शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्ष श्रेष्ठीला उमेदवारी देण्याची मागणी केली होती, त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली.

वाचा – मद्य पिऊन वाहन चालविणार तर कारवाई

20 मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले, त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली. Congress workers will resign en masse

 

21 मार्च ला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार, व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

 

वडेट्टीवार यांनी राज्यातील निवडणुकीकडे लक्ष द्यावे मात्र आज कांग्रेस पक्षात कांग्रेस विरुद्ध कांग्रेस अशी स्थिती निर्माण झाली आहे, जर आमदार धानोरकर यांना तिकीट मिळाली नाही तर आम्ही कांग्रेस पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. Congress workers will resign en masse

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!