Special Operation of Chandrapur Police होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्या संदर्भात विशेष मोहीम हाती घेतली आहे.
24 व 25 मार्च रोजी होळी व धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, रंगांच्या उत्सवात विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते, पार्टी दरम्यान काही अतिउत्साही तरुण मंडळी दारू चा अति घोट प्राशन करीत, वाहन अतिवेगात चालविण्याचे प्रकार करतात त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Special Operation of Chandrapur Police
वाचा – आता घरबसल्या करा मतदान, ही आहे प्रक्रिया
चंद्रपूर वाहतूक पोलीस नियंत्रक शाखा अपघात कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करीत आहे, अति-उत्साही तरुणांची हुल्लडबाजी व रॅश ड्रायव्हिंग वर आळा घालण्याचा उद्देशाने 22 ते 25 मार्च ला चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान कुणीही मद्य प्राशन करीत वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. Special Operation of Chandrapur Police
त्याकरिता कुणीही मद्य प्राशन करीत वाहन चालवू नये, उत्सवाच्या या सणात कुणाच्याही निष्पाप आयुष्याचा बेरंग होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.