Notification of Election Commission of India भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
85 वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. Notification of Election Commission of India
वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षाचा लोकसभा उमेदवार ठरला
85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार : 13- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 16621 मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 7117 तर स्त्री मतदारांची संख्या 9504 आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात असे एकूण मतदार 2754 (पुरुष – 1163, स्त्री – 1591), चंद्रपूर मतदार संघात 2380 (पुरुष – 1100, स्त्री – 1280), बल्लारपूर मतदार संघात 2246 (पुरुष – 892, स्त्री – 1354), वरोरा मतदार संघात 2878 (पुरुष – 1356, स्त्री – 1522), वणी मतदार संघात 2846 (पुरुष – 1225, स्त्री – 1621, आणि आर्णी विधानसभा मतदार संघात 3517 (पुरुष – 1381, स्त्री – 2136) मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 85 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 2403 (पुरुष – 921, स्त्री – 1482) आणि चिमूर मतदार संघात 2594 (पुरुष – 996, स्त्री – 1598) मतदार आहेत. Notification of Election Commission of India
असे आहेत दिव्यांग मतदार : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 9679 आहे. यात 6164 पुरुष तर 3515 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी राजुरा मतदार संघात 1233 दिव्यांग मतदार (पुरुष – 781, स्त्री – 452), चंद्रपूर मतदार संघात 913 दिव्यांग मतदार (पुरुष – 591, स्त्री – 322), बल्लारपूर मतदार संघात 1842 दिव्यांग मतदार (पुरुष – 1195, स्त्री – 647), वरोरा मतदार संघात 1551 दिव्यांग मतदार (पुरुष – 1021, स्त्री – 530), वणी मतदार संघात 1679 दिव्यांग मतदार (पुरुष – 1035, स्त्री – 644), आर्णी मतदार संघात 2461 दिव्यांग मतदार (पुरुष – 1541, स्त्री – 920) आहेत. Notification of Election Commission of India
तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची संख्या 1138 (पुरुष – 774, स्त्री – 364) आणि चिमूर मतदार संघात 1096 (पुरुष – 681, स्त्री – 415) मतदार आहेत.