Lok Sabha Nomination Application : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून कुणी भरला उमेदवारी अर्ज?

Lok Sabha Nomination Application  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत चंद्रपूर, वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 20 मार्च पासून सुरूवात झाली आहे मात्र या तीन दिवसात कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.

वाचा – गुगल हिस्ट्री मुळे 26 लाखांची रोख रक्कम मिळाली

20 मार्च रोजी 13 नामनिर्देशन अर्ज तर 21 मार्च रोजी 19 उमेदवारी अर्ज व 22 मार्चला 14 असे एकूण 46 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहे. Lok Sabha Nomination Application

 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. Lok Sabha Nomination Application

 

अद्यापही एकानेही चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही, होळी नंतर उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात अशी शक्यता आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!