Announcement of Lok Sabha Elections : 7 टप्प्यात होणार मतदान, चंद्रपूर लोकसभेचे मतदान 19 एप्रिल रोजी

Announcement of Lok Sabha Elections देशात 16 मार्च ला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

वाचा – नागरिकांना मिळणार 300 युनिट वीज मोफत

देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान होणार आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. Announcement of Lok Sabha Elections

 

असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक

१८ व्या लोकसभेसाठी मतदान सात टप्यात होणार

टप्पा १:- १९ एप्रिल २०२४
टप्पा २:- २६ एप्रिल २०२४
टप्पा ३:- ०७ मे २०२४
टप्पा ४:- १३ मे २०२४
टप्पा ५:- २० मे २०२४
टप्पा ६:- २५ मे २०२४
टप्पा ७:- १ जून २०२४
मतमोजणी :- ४ जून २०२४

देशात एकूण ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत..१ कोटी ८२ लाख नवमतदार

मतदान केंद्र शोधणे सोपे होणार, मतदारांच्या मदतीसाठी तंत्रज्ञान वापर केला जाईल

८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल

५५ लाख एव्हीएम मशीन असणार आहेत आणि १ कोटी ५ लाख निवडणूक अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षक असणार आहेत. Announcement of Lok Sabha Elections

 

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे.

नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराची सगळी माहिती मिळणार आहे.

 

हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत. असे प्रशासनाने कळविले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!