Pm Surya Ghar Yojana Online Apply चंद्रपूर – घराच्या छपरावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता .सुनील देशपांडे यांनी केले.
श्री. देशपांडे म्हणाले की, वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.
रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. Pm Surya Ghar Yojana Online Apply
महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. Pm Surya Ghar Yojana Online Apply
एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते. Pm Surya Ghar Yojana Online Apply
घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.